Top News महाराष्ट्र मुंबई

‘जेव्हा एका स्त्रीचे…’; अमृता फडणवीसांनी सांगितलं त्या ट्रोल होण्याचं कारण

मुंबई |  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोल होताना पाहिलं आहे.

शिवसेनेनं भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतल्यापासून त्या काहीना काही वक्तव्य करताना दिसल्या. यामध्ये काहीवेळा त्यांनी थेट शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले तर काहीवेळा त्यांनी पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे त्या ट्रोल झाल्या. यावर अमृता फडणवीस यांनी आपण ट्रोल होण्याचं कारण सांगितलं आहे.

जेव्हा एका स्त्रीचे विचार असतात. ते कधी कोणाला खटकू शकतात. तेव्हा लोकं ट्रोल करतात. त्यामुळे काही पक्षांना ते खटकले असतील तर त्यांनी मिळून मला ट्रोल केलं असेल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान, मी ट्रोल करण्याला काहीही मानत नाही. जसा माझा हक्क आहे ट्विट करण्याचा तसाच त्यांचा ही असल्याचं मिसेस फडणवीस यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल- संजय राऊत

“…म्हणून शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा

“रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला दहा लाखांचं रोख बक्षीस”

“केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही, काम पूर्ण करायला आलोय”

…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार

‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या