बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे पुरुषांच्या लिंगाचा आकार होतोय लहान; दिया मिर्झा म्हणाली…

मुंबई | राज्यातच नाही तर संपूर्ण जगात प्रदुषण हा गंभीर विषय बनलेला आहे. प्रदुषणाचा फक्त पर्यावरणावरच नाही तर मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यात जास्त वाईट परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे, असा संशोधनावर आधारित एक अहवाल अभिनेत्री दिया मिर्झाने ट्विटमध्ये शेअर केला आहे.

दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिने संशोधनावर आधारित एक अहवालही त्यासोबत शेअर केला आहे. ‘प्रजनन दरामध्ये माणूस संकटाचा सामना करत आहे, कारण मानवी लिंगाचा आकार लहान होत आहे आणि जनन इंद्रियही खराब होत आहे. त्याचबरोबर मानवी प्रजननालाही अवघड परिस्थितीकडे ढकलत आहे. थोडक्यात दुषित पर्यावरणाचा परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे’, असं त्या अहवालात सांगितलं आहे. ‘आता तरी जग, हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेईल’, असं कॅप्शन देत दियाने तो अहवाल शेअर केला आहे.

दियाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दिया पर्यावरणाच्या बाततीत जागरूक आहे. ती नेहमीच त्याबद्दल ट्विट करत लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत असते. फेब्रुवारीमध्ये दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत विवाह केला आहे. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कारण तिच्या लग्नात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला नव्हता. सोबतच तिच्या लग्नात एका महिला पंडितने सगळ्या विधी केल्या होत्या.

दरम्यान, बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिया मिर्झा आहे. दिया तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे मत मांडत असते. आता तिने सोशल मीडियावर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

“अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे विश्वासघाताने मुख्यमंत्री झाले”

‘सामना’तून सरकारवरच टीकेचे बाण; वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे

‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण?

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More