बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार’; बैलगाडीवरुन कोसळलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रसाद लाड यांचा खोचक टोला

मुंबई | इंंधन दरवाढीविरोधात मुंबईत आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान काँग्रेस नेते बैलगाडीवर चढले होते. मात्र, बैलगाडीवर वजन वाढल्याने ती कोसळली आणि बैलगाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस नेते जमिनीवर कोसळले. याच मुद्यावरून आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांना खोचक टोला लगावला आहे.

गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार. भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, माणसाने झेपेल तेवढंच करावं. असे पब्लिसिटी स्टंट करताना मुक्या जिवांचा विचार करावा, असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारने निर्माण केलेल्या महागाईविरोधात काँग्रेस नेत्यांनी 8 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात दहा दिवस काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी 7 जुलैला दिली होती.

8 जुलै रोजी नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने सायकल यात्रा काढून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत दहा दिवसीय आंदोलनाची सुरुवात केली होती. या सायकल यात्रेत पटोले यांच्यासह उर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे देखील सहभागी झाले होते.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

‘प्राण्यांना शारिरीक इजा केल्यामुळे भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा’; आयुक्तांकडे तक्रार

‘राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नाही त्यामुळे….’; राहुल गांधींना फडणवीसांंचा चिमटा

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष व्हावे पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More