बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी अल्टीमेटम, मग हकालपट्टी! आता बीसीसीआय म्हणते, “Thank you Kohli”

नवी दिल्ली | भारतीय वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची (Rohit Sharma New ODI Captian) नियुक्ती करण्यात आली आहे.  भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये आणि सर्वकालिन महान खेळाडूंमध्ये समावेश होणाऱ्या विराटला (Virat Kohali) बीसीसीआयनं (BCCI) डच्चू दिला की त्यानं राजीनामा दिली हे मात्र अद्यापी स्पष्ट झालं नाही. परिणामी आता भारतीय क्रिकेट संघामधील वाद समोर येत आहे.

विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वीच भारतीय टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यावेळी त्यांनं पुढील विश्वचषकापर्यंत वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याचा विचार बोलून दाखवला होता. पण बीसीसीआयनं विराटला अवघ्या 48 तासांमध्ये कर्णधारपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा वेळ दिला होता, अशी माहिती सध्या सर्वत्र पसरली आहे. अशात बीसीसीआयवर टीका होत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी विराट कोहलीच्या योगदानाबद्दल धन्यवाद असं ट्विट केलं आहे.

बीसीसीआयकडून कोहलीला राजीनामा देण्यासाठी 48 तास देण्यात आले होते. पण विराट कोहलीकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्यानं बीसीसीआयकडून शेवटी त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. परिणामी बीसीसीआयनं अशा पद्धतीनं कोहलीला काढल्यानं सर्वस्तरातून बीसीसीआयवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, बीसीसीआयकडून असं अचानक कर्णधारपदावरून एखाद्याला हटवण्याची घटना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकदा तब्बल 42 वर्षांपुर्वी घडली होती. पण सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असणारा सौरव गांगुली (Saurav Ganguly) आपल्या आक्रमक स्वभावासाठी सर्वपरिचीत आहे. परिणामी गांगुलीनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पाहा ट्विट 

थोडक्यात बातम्या 

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

“अतिशय सुरक्षित असलेल्या चॉपरचा अपघात कसा झाला?, याची चौकशी केली जावी”

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘अपघात नेमका कसा घडला?’, राजनाथ सिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More