नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या काळात कित्येक लोकांना हातची नोकरी गमवावी लागली होती. मात्र, आता आयटी (IT) क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी समोरून चालत आली आहे. जगातील आणि भारतातीलही आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी तब्बल 60,000 नोकऱ्या देणार आहे.
आयटी क्षेत्रातील नामाकिंत कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) 60,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेत आहे. कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी (Ashwin Yardi) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कॅपजेमिनीत जागतिक स्तरावर सुमारे 3 लाख 55 हजार कर्मचारी आहेत आणि त्यापैकी निम्मे कर्मचारी भारतात आहेत. शिवाय हेडकाउंटमध्ये चांगली वाढ दिसून येत असल्याने या आर्थिक वर्षात इतकी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही अश्विन यार्दी यांनी दिली आहे.
दरम्यान, कॅपजेमिनीने एरिक्सन (Ericsson) कंपनीसोबतच्या भागीदारीसह भारतात गेल्या वर्षी 5G लॅब लाँच केली आहे. 5G आणि क्वांटम यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रिंत करून ही नवीन नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही कॅपजेमिनी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“किरीट सोमय्या असं कॅरेक्टर जे महाराष्ट्रात फक्त भोंगा घेऊन बोंबलतं”
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर, वाचा आजचे दर
“आता भाग सोमय्या भाग चित्रपट काढावा”; राऊतांचा खोचक टोला
“पन्नास लाखांच्या घड्याळात ज्यांचं टायमिंग चुकलं ते आता…”
“ठाकरे सरकार हे जगातील सर्वात भ्रष्ट सरकार, शरद पवारांच्या…”
Comments are closed.