बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठं साम्य; ऑस्टेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचा मोठा दावा

मुंबई | भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याला क्रिकेटच्या दुनियेत देव मानलं जातं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटमधले अनेक रेकॉर्ड नावावर आहेत. सचिन तेंडुलकर एकच आहे आणि एकच राहणार असं मानलं जात होतं. यातच ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पाँटिंग याने सचिन तेंडुलकरची तुलना भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्याशी केली आहे.

सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ या दोघांची उंची कमी आहे. त्यामुळे त्यांना बॅकफूटवरून आणि फँटफूटवरून चेंडू जोरात मारता येतो असं रिकी पॉंटिंग म्हणाला आहे. पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळतो. रिकी पॉंटिंग देखील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत संधी दिली होती. परंतू त्याला या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर त्याला संघात स्थान दिल गेलं नव्हतं. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पृथ्वीने चांगली फटकेबाजी केली होती. या स्पर्धेत त्याने सर्वात जास्त धाव काढल्या होत्या. पृथ्वी शाॅ फाॅर्ममध्ये असल्यानं दिल्ली कॅपिटल्सला या हंगामात चांगला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सला कर्णधार राहिलेला श्रेयस अय्यर याच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो या हंगामात खेळणार नाही. त्यामुळे दिल्लीचे सलामवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.

थोडक्यात बातम्या-

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”

“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More