बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या बैठकीत 12 प्रमुख मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या समोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिलं, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ‘आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,’ अशी मागणीही यावेळी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या 56 हजार जागा कमी झाल्या आहेत. एससी एसटी आरक्षण हे संविधानिक आहे आणि ओबीसी आरक्षण हे वैधानिक आहे. ओबीसी आरक्षण संविधानिक करण्यासाठी केंद्रानं घटनादुरुस्ती करावी. 2011 जनगणनेची माहिती राज्याला मिळावी. 2021 च्या जनगणनेत ओबीसीची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्राकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी राज्याच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी अतिवृष्टीचा इशारा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ‘हे’ आदेश

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

अबब! अन् तिने चक्क साडीवरच सिलिंडर उचलून केला वर्कआऊट; व्हिडीओ तुफान व्हायरल

“अजित पवार चिरीमिरी खात नाही. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More