बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब… बाॅसने छेडल्यानंतर मुलीने केला असा प्रतिकार; व्हिडीओ पाहुन व्हाल थक्क

नवी दिल्ली |  महिलांसोबत गैरवर्तन करणारे अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. महिलांची छेड काढून मजा घेणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी अनेक वेळा महिला पुढाकार घेत नाही. तसेच भीतीपोटी अनेक महिला होणारा त्रास गप्प राहून सहन करतात.

महिला गप्प राहिल्याने त्रास देणाऱ्यांची हिंमत वाढते आणि ते आपले गैरवर्तन सुरूच ठेवतात. अशाच एका ऑफिसमधील बॉसने आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला छेडलं आणि त्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागले. चीनमधील एका महिलेने आपल्या बॉसने छेडछाड केल्यामुळे त्याला बेदम मारहाण करत संपूर्ण ऑफिसची नासधूस केली.

या प्रकरणाचा व्हिडिओ बनवून तिने सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून संबंधित महिलेच्या बाजूने अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रकरणातील आरोपी बॉसला संबंधित महिला अद्दल घडवण्यासाठी ऑफिसमध्ये जाऊन त्याला बेदम मारहाण करते आणि त्यानी केलेल्या कृत्याची सजा त्याला देते.

छेडछाड करणारा बॉस हे सर्व होत असताना मात्र गप्पपणे आपल्या खुर्चीवरच बसून असतो. सदरील महिला काचेची एक प्लेटही त्याच्या डोक्यात फोडताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा सर्व प्रकार चीनमधील एका सरकारी कार्यालयातील असल्याने एकच खळबळ माजली आहे. तसेच संबंधित व्यक्ती त्या मुलीला अश्लील मेसेजेस पाठवत होता आणि गैरवर्तन करत होता त्यामुळे वैतागलेल्या महिलेने त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचं पाहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

“संजय राऊत हे गडकरींनाच काय अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात”

दिलासादायक! येत्या 5 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होणार

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More