बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रीडाप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ देशात पार पडणार आयपीएलचे उर्वरित सामने

मुंबई | 2021 च्या उर्वरित आयपीएलमधील सामने कुठे खेळवणार?, ही स्पर्धा होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र बीसीसाआयने उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.

एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलकडे प्रत्येक क्रीडाप्रेमीचं लक्ष असतं. कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही याबाबत मोठा प्रश्न होता मात्र बायोबबलमध्ये होणार असल्याने धोका नाही यावर ठाम राहत बीसीसीआयने आयपीएल भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला. परंतू स्पर्धेदरम्यान काही खेळडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल थांबवण्यात आली होती.

आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाने बायो बबलमध्ये शिरकाव केला अन् रंगात आलेली स्पर्धा थांबवण्यात आली. क्रीडाप्रेमी नाराज झाले होेते 4 मेला स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात लोकांंचंही मनोरंजन होत होतं.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धा ही भारता होणार आहे की?, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र भारतात वाढत्या कोरोना संकटामुळे विश्वचषक भारतात घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय करण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

मन सुन्न करणारी घटना; नवरा-बायकोच्या भांडणामुळे दोन मुलांना गमवावा लागला जीव

चीनच्या तरूणीने गायलं ‘हे’ हिंदी गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More