बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार”

मुंबई | मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक दुर्घटना घडल्या. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षातील नेते सत्तधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच आजच्या सामनाच्या अग्रलेखात मुंबईत झालेल्या दुर्घटनेत दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळे. काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या, असं शिवसेेनेनं म्हटलंय. याला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हो खरंच मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी पालिकेतील टक्केवारीजीवी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळे दुनिया जबाबदार आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला चांगलंच फटकालं आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखावरून भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. 2017 मध्ये मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये पाऊस जबाबदार ऐसा कैसे चलेगा?, असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत केला आहे. तसेच त्यांनी पुढे ‘ये मुंबई है ये सब जानती है’ असंही म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यामध्ये कोणाचंही सरकार आलं तरी, या सगळ्यामध्ये मुंबईकरांना दरवर्षी पावसाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे सरकारचा हा हलगर्जीपणा कुठंपर्यंत चालणार?, यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर नागरिकांचं रौद्ररूप बाहेर यायला वेळ लागणार नाही.

 

 

थोडक्यात बातम्या-

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More