उस्मानाबाद | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच मुद्याला अनुसरून बी. ए. एम्. एस. च्या आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल करण्याचे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते
आयुर्वेदाचा अभ्यासक्रम हा प्राचीन काळापासून शिकवला जात आहे. आता काळ बदलला असून ते संदर्भ अभ्यासक्रमात गरजेचं आहेत का हे आयुर्वेदिक संचालनालय तपासेल आणि आवश्यक असे बदल केले जातील, असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
कीर्तनकार इंदोरीकर यांनी अष्टांगहृदयम व सुश्रुत संहिता ग्रंथाचा आधार घेत वक्तव्य केलं होतं. आणि त्याच ग्रंथाचा आयुर्वेद अभ्यासक्रमात सम आणि विषम फॉर्म्युला शिकवला जात असल्याचा संदर्भ अनेक कीर्तनकार आणि आयुर्वेदचार्य यांनी इंदोरीकरांच्या समर्थनात दिला होता.
दरम्यान, आता आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल करतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….
मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो”
‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…
“वारिस पठाण हे लावारीस पठाण आहेत; समोर आले तर थोबाडीत देईन”
Comments are closed.