Top News खेळ

…तर सामन्याचा निकाल वेगळा असता- महेंद्रसिंग धोनी

दुबई | कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 10 रन्सने पराभव केला. सामन्यात हार पत्करल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.

धोनी म्हणाला, सामन्यात एक वेळ अशी होता की त्यांनी 2-3 ओव्हर्स चांगल्या टाकल्या. आम्हीही विकेट्स गमावल्या. त्या मधल्या ओव्हरमध्ये आमची फलंदाजी चांगली झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता.

गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, मात्र फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. धावांचा पाठलाग करताना अखेरच्या ओव्हरमध्ये चौकारही मारता आले नाही. अशा परिस्थिती तुम्ही फटके मारायला शिकायला हवं, असंही धोनी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या