बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक देशात चर्चेचा विषय आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असल्यामुळे दिल्लीकडे सत्तेकडे जाणारा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हटल जातं. अनेक दिग्गज नेत्यांनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 40 पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या.

योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री आहेत की, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येणार आहेत. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं आहे. आधीच्या सरकारकडून फक्त घोषणा करण्यात आल्या. जनतेने मला सेवा करायची संधी दिली. गरिबांपर्यंत शासकिय योजना पोहोचविण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

अगोदरच्या सरकारकडून फक्त घोषणा करण्यात येत होत्या. मात्र, अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. भाजपला चारही दिशांकडून आशिर्वाद मिळाला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मतदारांचे आभार मानले आहेत. 2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

माता भगिनींचा भाजपला आशीर्वाद हे भाजपचं सौभाग्य आहे. जातीयवादी नेत्यांना युपीतील जनतेने निवडणुकीतून धडा दिला, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेची मन जिंकली आहेत. युपीमध्ये सलग दुसऱ्यांना सेवा करण्याची संधी दिली आहे. तर गोव्यातील जनतेने तिसऱ्या वेळेस सेवा करण्याची संधी दिली आहे. गरिबांना रेशन, लसीकरण, आधुनिक इन्फास्ट्रक्चर या विषयांवर काम केल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डबल इंजिनचं सरकार असणाऱ्या ठिकाणी दुप्पट विकास झाला आहे. भारताच्या माता भगिनींनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. जनतेने भाजपला पुन्हा सेवा करायची संधी दिली आहे.  देशाचा सामान्य नागरिक राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये सहभागी झाला आहे. देशात जगातील सर्वात मोठं लसीकरण करण्यात आलं आहे. परिवारवादी लोकांनी राज्याचं मोठं नुकसान केलं आहे, असा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. भारतात परिवारवादी राजकारणाचा सुर्यास्त होईल, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

“जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है”

चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला गंभीर इशारा, म्हणाले ’11 तारखेला…’

Wheather Update : पुढील 5 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस

“ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची….”; आशिष शेलारांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More