बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

नवी दिल्ली | तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून भाजपला एकामागोमाग एक धक्के दिले आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्षांना तृणमूल काँग्रेसमध्ये माघारी आणलं आहे. भाजपच्या गळाला लागलेला सर्वात मोठा नेता घरवापसी करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याबाबत अधिकृत घोषणा बाकी आहे.

मुकुल रॉय हे भाजपच्या पहिल्या फळीतले नेते असं मानलं जात होतं. गेल्या चार वर्षांपुर्वी त्यांनी वाजत-गाजत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच भाजपने बंगालवर सत्ता प्रस्थापित करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार विधानसभेच्या तोंडावर अनेक आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगमागे मुकूल रॉय यांचा हात असल्याचं बोललं जातं. मात्र आता मुकूल रॉयच माघारी फिरत असल्यानं त्यांच्या गटातले बरेचसे आमदार पुन्हा तृणमूलमध्ये परत येण्याची शक्यता आहे.

मुकूल रॉय यांच्या पत्नी आजारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करत विचारपूस केली होती. मात्र त्यानंतरही रॉय यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बंगालमध्ये भाजपचे 33 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा  आहेत.  शुभ्रांशु रॉय पक्ष सोडणार असं सांगितलं जात होतं पण मुकुल रॉयसुद्धा पक्ष सोडणार आहेत.

दरम्यान, ममता यांच्यानंतर पक्षात त्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. मुकूल रॉय चार वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेले होते. त्यासाठी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा त्यांनी घरवापसी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

गप्पा मारण्याच्या नादात नर्सनं एका व्यक्तीलाच दिले कोरोना लसीचे दोन डोस अन्…..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More