बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जड्डुला प्रसिद्धी नको आहे, तो शांतपणे सर्वांना मदत करतो”

मुंबई | चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा सध्या मैदानावर तुफान खेळी करत चैन्नईला विजय मिळवून देत आहे. मैदानावर दमदार कामगिरी करणारा रवींद्र जडेजा क्रिकेट बाहेरील जगात देखील चांगली समाजसेवा करतो. जड्डुला प्रसिद्धी नको आहे,तो शांतपणे सर्वांना मदत करतो, असा खुलासा रवींद्र जडेजाच्या बहिणीने केला आहे.

आम्ही राजकोटमधील अनेक गरजूंना घरी रेशन देण्याची व्यवस्था केली आहे. जड्डु स्वतःहून कधी जात नाही. त्याला पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी जमते म्हणून तो कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही आणि आमच्या टीमने घरोघरी अन्नाच्या वस्तू आणि रेशन पोहचवलं आहे, असं रवींद्र जडेजाची बहीण नयना हिनं सांगितलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समस्या थोडी वेगळी आहे. लोक काम करत असतील. परंतु कोरोना रुग्णांना उपचार घेता येत नाही, कुठेही बेड नाहीत.कोणाला लागणारं ऑक्सिजन किंवा औषध उपलब्ध नाही, ही बातमी कळताच आम्ही सर्व मदतीला जात आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून ते ऑक्सिजन शोधण्यापर्यंत आम्ही आणि आमची टीम मदत करत आहे, असं नयनाने सांगितलं आहे.

दरम्यान, राजकोट शहराच्या मध्यभागी जडेजाचं ‘जड्डु फूड फिल्ड’ हे रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये 25 लोक कामाला आहेत. लाॅकडाऊनमध्ये हे सर्व लोकं गावाला गेली आहेत. तरी देखील रवींद्र जडेजा दर महिन्याला त्यांना पैसे पोहचवत असतो, असं देखील नयनाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरकारवर खापर फोडण्याआधी स्वत: शिस्त पाळा”; बेशिस्त नागरीकांना औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More