बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ

मुंबई | कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनाची परिस्थिती कुठे आटोक्यात येत असतानाच डेल्टा व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. नवनवीन आढळून येणाऱ्या व्हेरिएंटनं राज्याची परिस्थिती चिंताजनक बनवली आहे. अशातच आता या संसर्गजन्य डेल्टा प्लस व्हेरिएंटनं राज्यात मृत्यूचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली आहे.

राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संसर्गानं आत्तापर्यंत राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील एका महिलेनं कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस घेऊनही तिचा डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संसर्गानं मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटनं घेतलेला पहिला बळी 60 वर्षीय महिलेचा आहे. तर 69 वर्षीय व्यक्तीचा नागोठाणेमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे बळी गेलाय. याशिवाय 80 वर्षीय एक महिलेचा रत्नागिरीमध्ये मृत्यू झाला होता. डेल्टा प्लसच्या वाढत्या संसर्गमुळे राज्यातलं मृत्यूचं प्रमाणं वाढताना दिसत आहे.

दरम्यान, रा़ज्यातला वाढता मृत्यूचा आकडा आणि वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. डेल्टाचं सावट कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामावर लागल्या असून अभ्यासातून नवनवीन माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांसाठी भरती

लोकांना कपडे कसे घालावे याचा सल्ला देते आणि स्वतः…’ ‘त्या’ फोटोवरुन कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांवर संजय राठोडांनी मौन सोडलं, म्हणाले…

‘एक माली दो फूल’, प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत बघताच प्रेयसीची सटकली अन्….,

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More