बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना, डेंग्यूनंतर ‘या’ साथीचा धोका; अचानक रूग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातून सावरत असताना आता स्वाईन फ्लूने तोंड वर काढले आहे. महाराष्ट्रात(Maharashtra) स्वाईन फ्लूचे(swine flu) रूग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे 43 रूग्ण असून आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे 142 रूग्ण  सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची आणि महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून स्वाईन फ्लूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नव्हता परंतु या वर्षी 2022 मध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यूही झालेले आहेत. 1 जानेवारी 2022 ते 21 जुलै 2022 पर्यंत 142 रूग्ण सापडले असून सर्वाधिक मुंबईत 43 तर पु्यात 23( मृत्यू ), पालघर 22, नाशिक 17, नागपूर 14, कोल्हापूर 14  (मृत्यू 2), ठाण्यात 7, कल्याण डोंबिवली प्रत्येकी 2 रूग्ण आढळले आहेत. जुलै महिन्यात 11 रूग्ण सापडले आहेत अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिली आहे.

2009 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्वाईन फ्लूला संसर्गजन्य आजार म्हणून जाहीर केलंय. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे तो व्यक्ती शिंकला अथवा खोकला की त्याचे विषाणू हवेत पसरताात. याचे विषाणू 8 तासापर्यंत जिवंत राहू शकतात.  हा आजार प्राण्यांपासून देखील होऊ शकतो.

स्वाईन फ्लूची लक्षणे सामान्य तापासारखीच आहेत.  ताप येणे, थंडी वाजणे, पोट दुखणे, उलटी येणे, मळमळ होणे, थकवा येणे यासारखी लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. 65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्वोदर महिला, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. सर्वांनीच योग्य ती काळजी घ्यावी, असं आरोग्य विभागाने सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या : 

“ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने निघाले”

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More