बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गंगा नदीने पुन्हा धारण केलं रौद्र रुप, भगवान शंकराच्या मुर्तीला स्पर्श करतंय पाणी

डेहराडून | गेल्या काही तासांपासून उत्तराखंडच्या मैदानी आणि डोंगराळ भागात सलग पाऊस चालू आहे. सलग चालू असलेल्या पावसामुळे उत्तराखंडमधील नद्यांनी रौद्ररुप धारण केलं आहे. यामुळे स्थानिक लोकांच्यात भितीचं वातावरण तयार झालं आहे. राज्यातील जवळपास सर्वच नद्या उफाळून वाहत आहेत.

ऋषिकेशमधील गंगा घाट पुर्णपणे जलमय झाला आहे. गंगा नदीचं पाणी पुन्हा एकदा भगवान शंकराच्या मुर्तीला स्पर्श करुन वाहत आहे. 2013 मध्ये आलेल्या पुराच्यावेळी असं दृष्य पाहायला मिळालं होतं. हरिद्वारमध्ये देखील गंगा नदी उफाळून वाहत आहे. तसेच अलकनंदा, मंदाकिनी, नंदाकिनी, शारदा, गोरी, कोसी, रामगंगा यासह अन्य नद्या देखील पुर्णपणे भरून वाहत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गंगा नदीच्या पाण्याची पातळी 340.34 आरएल मीटरपर्यंत पोहोचली आहे. ऋषिकेशमध्ये गंगा नदी धोका पातळीपासून 18 सेमी खाली वाहत आहे. परमार्थ निकेतन स्वर्गाश्रम, त्रिवेणी आणि लक्ष्मण झूला यांचे जवळपास सर्वच गंगा घाट पाण्याखाली गेले आहेत. मयकुंड, चंदेश्वर नगर देखील पाण्याने भरुन गेले आहेत.

हरिद्वारमध्ये आज सकाळी पाण्याची पातळी 3 लाख 92 हजार 104 क्युसेकपर्यंत पोहोचली होती. तसेच इतर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गाळ देखील वाहत आहे. तूर्तास तरी हरिद्वारमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.

थोडक्यात बातम्या – 

‘येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का?’; अजित पवार म्हणाले…

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More