बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगी सरकारची मोठी घोषणा; राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला देणार ‘हे’ नाव

लखनऊ | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर योगी सरकार कल्याण सिंह यांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येतील प्रसिद्ध राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला आता कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येणार आहे. यापुढे आता हा रस्ता कल्याण सिंह मार्ग म्हणून ओळखला जाईल. याशिवाय राज्यातील लखनऊ, एटा, प्रयागराज, बुलंदशहर आणि अलिगढ शहरातील काही रस्त्यांना कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

केशवप्रसाद मौर्य त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले की, राम भक्त स्वर्गीय कल्याण सिंह बाबूजींच्या नावाने सार्वजनिक बांधकाम विभाग अयोध्या, अलीगढ, एटा, बुलंदशहर, प्रयागराजमध्ये प्रत्येकी एक एक रस्त्यास नाव देण्यात येईल. मौर्य त्यांच्या ट्विट मध्ये पुढे म्हणतात की, बाबूजींनी राम मंदीरासाठी सत्ता सोडली पण, स्यंयसेवकांवरती गोळ्या घातल्या नाहीत. लवकरच नामांतराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहे.

दरम्यान, याआधीही उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून योगी सरकार सतत कोणत्या ना कोणत्या जुन्या ऐतिहासीक रस्त्यांचे, शहराचे नामांतर करण्यावर भर देताना दिसत आहे. अलाहाबादचे प्रयागराज असं नामकरण याआधी झालं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

“काल-परवा भाजपत घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर बसले”

“राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”

“आधी देश, मग पक्ष म्हणणाऱ्या भाजपने पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला”

युद्धजन्य परिस्थितीतही चिमुरड्यांकडून एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम, पाहा व्हिडीओ

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More