बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटाच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

मुंबई | शिवसेनेच्या बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्तांतर घडवले. पण भाजपमधील नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू लागल्याने काही बंडखोर आमदार आक्रमक झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर श्रद्धा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर होणारी टीका सहन करणार नसल्याचा थेट इशाराच भाजपला दिला आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पुन्हा शिंदे गटाची भूमिका मांडली. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी सर्वांना अलर्ट केलं. आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणाही वाईट बोलू नये हे आम्ही स्पष्ट केलं आहे, असं ते म्हणालेत.

आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. त्यांना आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. केसरकरांच्या या भूमिकामुळे शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!

गौतम अदानी मुकेश अंबानींच्या जिओला देणार टक्कर!

“धनुष्यबाण आमचा प्राण आहे, आधी प्राण जाईल मग धनुष्यबाण”

उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण….- बच्चू कडू

…अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विठ्ठलाची महापूजा करता येणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More