बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेचा यु-टर्न, भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेनं केलं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukrain War) जगावर मोठं संकट घोंघावत आहे. जागतिक स्तरावर विविध घडामोडी घडत असताना आता अमेरिकेकडून (America) भारतासंबंधी महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे उप सुरक्षा सल्लागार दलिप सिंह भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी भारताला एक इशारा दिला होता.

वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारनं रशियाकडून कच्च तेल आयात करण्याच्या निर्णयाला सिंह यांनी विरोध केला होता. मात्र आता व्हाईट हाऊसकडून अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं आहे. रशियन तेल आयात करायचे की नाही हा प्रत्येक देशाचा स्वतंत्र निर्णय आहे, असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

भारत रशियाकडून त्यांच्या ऊर्जा आयातीपैकी फक्त एक-दोन टक्का आयात करतो, असं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी म्हणाले आहेत. भारताच्या आयातीपैकी सुमारे दहा टक्के तेल हे संयुक्त राष्ट्रामधून येते, असंही जेन म्हणाले आहेत.

दरम्यान, भारत-रशिया संबंध चांगले असले तरी अमेरिकेसोबत असलेले व्यापारी संबंध अमेरिका किंवा इतर कोणीही नाकारू शकत नाही. भारत हा अमेरिकेच्या दृष्टीने एक मोठी बाजारपेठ आहे

थोडक्यात बातम्या –

कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”

“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More