बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; अंगावर काटा अणणारा व्हिडीओ समोर

मुंबई | मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात 132 झाडे उन्मळून पडली आहेत.

मरीन ड्राईव्ह येथे समुद्राच्या उंच लाटा पाहायला मिळाल्या आहे. समुद्राचं रौद्र रुप पाहून कोणालाही भीती वाटेल. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत. समुद्र किनाऱ्यांपासून लांब तसेच घरातच राहण्याचं आवाहान प्रशासन आणि हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

मुंबईत आज IMD ने Cyclone tauktae मुळे Red Alert जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात सोमवारी दुपारपासून तुफान वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला. मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काल 16 मे रोजी मुंबईत 50 झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी 8 ते 10 या दोन तासात एकूण 132 झाडे कोसळून पडली आहेत.

मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! आज बाधितांचा आकडा हजाराच्या आत तर…; वाचा आजची आकडेवारी

…अन् वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत घेतले सात फेरे!

‘किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?’; पवारांचा मोदी सरकारला सवाल 

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 अत्यंत महत्त्वाचे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More