बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल- RSS

बंगळुरु |  बेंगळुरु येथे शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आर.एस.एसच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. एवढचं नाही तर देणगी देण्याच्या अभियानामुळे भारत देश श्रीरामांशी जास्त प्रमाणात भावनिकदृष्ट्याने जोडला गेला असून राम मंदिरामुळे भारत देश अधिक बलशाही बनेल, असा विश्वास आर.एस.एसने व्यक्त केला आहे.

बौद्धिक अभियानाच्या माध्यमातून यासंदर्भातील कायदा आणि विचार पोहोचवणे आवश्यक आहे. आम्ही लव्ह जिहाद या शब्दाचा वापर करत नाही. न्यायालयाकडून असे शब्द वापरले जातात. कोणत्याही चुकीच्या उद्देशाने मुलींना प्रलोभने देऊन त्यांच्याशी विवाह करणे आणि त्यानंतर धर्मांतरण करणे या प्रवृत्तीला विरोध व्हायला हवा, संघाचे नवीन सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, संघाच्या या बैठकीदरम्यान कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. राम माधव यांना संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राम माधव यांना यापूर्वी संघातून भाजपमध्ये पाठवण्यात आलं होतं. भाजपमध्ये आल्यानंतर माधव यांच्याकडे महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा राम माधव यांना संघात परत बोलावण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वाझेला कामावर रुजू करून घेताना सरकार काय झोपलं होतं का?”

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

“साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More