बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार

मुबंई | राज्यातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा समजला जाणार सण म्हणजे गणेशोत्सव आणि दहीहंडी. कोरोनामुळे या सगळ्यावर अनेक निर्बंध लावले गेले होते. या निर्बंधासंबधी आणि या सगळ्या सणासंबधी सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उंचीवरची मर्यादा काढली असल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदा आणि सुवव्यस्थेचं यामध्ये पालन झालं पाहिजे यासंबधी सूचना दिल्या आहेत. ध्वनीप्रदुषणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोविडचे सगळे निर्बध काढले आहेत. मंडपच्या संबधीही सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दहिहंडी आणि सगळे उत्सवात कायद्याचं पालन करण्यास सांगितलं आहे. हायर्कोटाच्या, सुप्रीमकार्टाच्या नियमानुसार दहीहंडी उत्सव करण्यास सांगितलं आहे. खड्डे दुरूस्तीची कामे जलद आणि विसर्जनाघाटाशी लाईटची व्यवस्था करण्यास सांगितली आहे. कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडणार असल्याचंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या

माहेरी गेलेल्या बोयकोला परत आणा म्हणत तरुण चक्क टॉवरवर चढला!

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे जे त्यांच्या नादी लागले ते…”

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More