बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं पूर्ण सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेत आहे”

मुंबई | सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: मुंबई शहरामध्ये तर पाऊस थांबायचं नावच घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईची तुंबई झाली आहे. या सगळ्या समस्यांना सर्वसामान्य जनतेला तोंड द्यावं लागत आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

भाजप पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

भातखळकरांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये रस्त्यावर सगळीकडे पाणी साठलं असल्याचं दिसतं आहे. एक व्यक्ती रस्त्यावरून जात आहे. आणि त्याचा पाय रस्त्यावरील चेंबरवर पडतो. ते चेंबर नीट बसवलं नसल्यामुळे तो खाली पडतो. हा सगळा प्रकार एका दुकानाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना भांडुप व्हिलेज रोड परिसरातील असल्याचं समजत आहे.

दरम्यान, शनिवार 17 जूलै रोजी चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने काही घरांवर संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळजवळ 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याच दिवशी विक्रोळीमध्येही अतिपावसामुळे एक दुर्घटना घडली असून, त्यामध्येही काहींचा मृत्यू झाला असल्याचंही समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जात केले गंभीर आरोप

मिकाचा राज कुंद्राला पाठिंबा; म्हणतो, “मी अॅप बघितलं, त्यात फार काही नव्हतं”

“लॉकडाऊन उठवा… अन्यथा रस्त्यावर उतरुन आम्ही स्वतः दुकानं उघडी करु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More