बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

 ‘या’ जिल्ह्यात तौक्ते वादळात खलाशी बेपत्ता, घरांचं नुकसान तर गावांचाही संपर्क तुटला

सिंधुदुर्ग |  सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात तौक्ते चक्रीवादळामुळं वादळी वाऱ्यासह पाऊस  झाला. त्यातच 3 खलाशी बेपत्ता झाल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खलाशांच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं तटरक्षक दलाचीही मदत घेतली  आहे. या खलाशांचा शोध अद्याप सुरू आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळं समुद्राला मोठं उधाण आलं होतं. उंचच उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकत होत्या. चक्रीवादळामुळं देवगड बंदरात नांगरलेल्या बोटीचा नांगर तुटला आणि त्यामुळे बोटीवरील तीन खलाशी बेपत्ता झाले, अशी माहिती जिल्हा आपत्कालीन विभागाला मिळाली. नांगर तुटलेल्या बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी इतर 4 खलाशांनी प्रयत्न केला. मात्र, उधाणलेल्या समुद्रामुळे तिन्ही खलाशी बेपत्ता झाले.

चक्रीवादळामुळं दिवसभरात 447 घरांचं नुकसान झालं, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तर, 37 गोठ्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. 3 शाळांचे नुकसान झाले आहे. तसेच 23 विजेचे खांबही पडले असून 2 विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे सिंधुदुर्गातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. तर, आंब्याचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळं वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. एकूणच सिंधुदुर्गातील अनेक गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही पडले आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांवरील सर्व अडथळे दूर करण्याचं काम सुरू केलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. रत्नागिरीतील 3896 नागरिकांचे, सिंधुदुर्गातील 144 तर रायगडातील 2500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.

थोडक्यात बातम्या

एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटं दाखविण्याचा हा काळ नाही- मोहन भागवत

हवामानाची माहिती देत असतानाच महिला अँकरसोबत घडलं असं काही की…; पाहा गंमतीशीर व्हिडिओ

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

तौक्ते चक्रीवादळाने घेतला वेग; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, विजपुरवठाही खंडीत

कोरोना रुग्णांसाठी भन्नाट कल्पना; कोविड सेंटरमध्येच उभारलं ग्रंथालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More