बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सततच्या होणाऱ्या सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी SBI ने सांगितले ‘हे’ मार्ग

नवी दिल्ली | कोरोना काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच जगातील सर्वात प्रसिद्ध एसबीआय बँकने अशाप्रकारच्या क्राईम्स पासून वाचण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

सुरक्षा बाळगण्यासाठी एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार नेहमी लास्ट लॉगइन डेट आणि वेळ तपासून इंटरनेट बँकिंग पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. तसेच पब्लिक वायफाय, फ्री वायफाय, सायबर कॅफे आणि इतरांशी शेअर होणाऱ्या पीसीवरुन इंटरनेट बँकिंगचा वापर करू नका. कधीही खासगी माहिती बँक साईटवर अपडेट केल्यावर रिवॉर्ड देण्याचा दावा करणाऱ्या ईमेल, एसएमएस आणि फोन कॉलपासून सावध राहा.

कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावरुन अॅप डाउनलोड करू नये. तसेच बँक साईटवर जाण्यासाठी कधीही मेल किंवा मेसेज बॉक्समध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांकडून मॅनेज होणाऱ्या हेल्पलाईनवर कॉल करावा लागेल.

जर फ्रॉड झाल्यापासून 24 तास झाले असतील, तर पीडित नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. कोरोना काळात अनेक राज्यांमध्ये हनीट्रॅप रचून व्हीडीओ काॅल तसेच व्हाॅट्सअॅप ग्रुप द्वारे देखील अनेक साईबर क्राईम झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

खासदारकी मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो- संभाजीराजे भोसले

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

आनंदाची बातमी! कोरोना झाल्यावर वर्षभर…; रिसर्चमधून दिलासादायक खुलासा

कौतुकास्पद! 11 वर्षीय मुलीने साडी घालून स्केटींग करत केली लसीकरणाची जागृती

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More