बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

मुंबई | भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी बंद दाराआड झालेल्या खास बैठकीत भाजपला जशास तसं उत्तर देण्याचं ठरल्याचं बोललं जात आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढून ही विशेष बैठक झाल्याची माहिती आहे.

सरकारची प्रतिमा मलीन करून जनतेच्या मनात संभ्रम तयार करण्याचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे, याबाबत प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री या बैठकीत आक्रमक झाले होते, असं समजतंय.

मागील सरकारच्या काळातील अशा घोटाळ्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी महाआघाडीमधील तीन पक्षांच्या तीन मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यांना ज्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल, त्याची पूर्तता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याचे काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More