बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळेनेच चुकीचे गुण बोर्डाला पाठवले; पुण्यातील प्रसिद्ध शाळेतील प्रकारानं खळबळ

पुणे | कोरोना महामारीत राज्यातल्या सगळ्या शाळा बंद करण्याची वेळ सरकावर आली. कोरोनामुळे या वर्षी अंतर्गत मुल्यमापणाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये घोळ झाल्याचे प्रकार झालेले दिसून आलेत. मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो, अशाच प्रकारे पुण्यातील प्रसिद्ध शाळेतील एका विद्यार्थ्याला असाच मोठा फटका बसला असून त्यामुळे वणवण भटकावं लागत आहे.

पुण्यातील नुमवी मुलांच्या शाळेतून सक्षम तेलतुंबडे हा विद्यार्थी इयत्ता 10 वी तूूून उत्तीर्ण झाला होता. त्याला  11 वी मध्ये आय. टी. विषय घ्यायचा होता. परंतु शाळेकडून सक्षमचे चुकीचे गुण बोर्डाकडे पाठवण्यात आले होते. त्याबाबत सक्षमने शाळेकडे विचारणा केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.

याबाबतीत शाळेने ती चूक मान्य केली आहे. शाळेतील सक्षम सारखेच काही विद्यार्थ्यांना मराठी विषयाचेच गुण संस्कृत विषयाला देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात घोळ झाल्याने ती चूक शाळेने देखील मान्य केली. याबाबतीत बोर्डाकडे सुधारीत गुण पुन्हा पाठवले आहेत. त्यामुळे पुढील कार्यवाही बोर्डच करणार असल्याचं शाळेने सांगितलं आहे.

दरम्यान, सक्षम हा वर्गात नेहमी पहिला येणारा परंतु त्याला शाळेच्या एका चुकीमुळे त्याला मोठा फटका बसला आहे. 11 वीत आय टी विषय घेण्यासाठी सक्षमला आता वणवण भटकायला लागत आहे.

थोडक्यात बातम्या- 

इंग्लंडच्या भूमीत रोहितचा हिट-शो! गगनचुंबी षटकार ठोकत झळकवलं परदेशातील पहिलं शतक; पाहा व्हिडीओ

कोरोना फक्त उद्धव ठाकरेंशी बोलतो, माझ्याशी बोलत नाही- चंद्रकांत पाटील

मी दिलेला शब्द पाळला आहे, राजू शेट्टी काही बोलत असतील तर…- शरद पवार 

पंकजा मुंडेंना धक्का! मुख्य सहाय्यक अधिकारी चितळेंना अटक, ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा!

एकाचवेळी दोघांना डेट करणं मुलीला पडलं महागात, भांडाफोड झाल्यावर मुलांनी केलं असं काही…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More