मुंबई | कोरोनामुळं (Corona) गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं (Students) मोठं नुकसान झालं आहे. पालकांनी कोरोना काळात अनेकदा शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. आता शाळा सुरळीतपणे सुरू आहेत. अशातच प्रशासनानं महत्त्वाचं निर्णय घेतला आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात देखील शाळा सुरू राहणार आहेत.
शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे. अपुर्ण अभ्यासक्रम असल्यानं पालकांकडूनही नाराजी दर्शवण्यात आली होती. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणासह अनेक गोष्टींनी विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीत बदल करावे लागले. आता उन्हाळ्यात देखील अभ्यास करावा लागणार आहे.
थोडक्यात बातम्या –
धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन
“आम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर प्रचंड नाराज आहोत”
रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध
नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.