जळगाव | कडाक्याचा उन्हाळा (Sumeer) सुरु झाला असून उष्णतेनं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी उष्णतेचं प्रमाण जास्त असलेलं पहायला मिळत आहे. उन्हाचा पारा वाढला असून हवामान विभागानंही उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उष्माघातामुळे (heatstroke) तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
जळगावमध्ये (Jalgaon) एका जणाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव आणि विदर्भात उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
टेंशन वाढलं! चीनमधून कोरोनाबाबत ‘ही’ धडकी भरवणारी बातमी समोर
‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; मनसेचा घणाघात
Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने केली या जबरदस्त प्लॅनची घोषणा
मोठी बातमी! HDFC ने केली अत्यंत महत्त्वाची घोषणा
“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”
Comments are closed.