बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोंबड्यांमुळे नवा व्हायरस पसरण्याची भीती; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

रोम | कोरोना महामारीनं अवघ्या जगातील नागरिकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. 2019 पासून अजूनही कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही. कोरोनानंतर जगातील विविध देशात अनेक नवीन आजारांनी डोकंवर काढलं होतं. कोरोनावर उपाय म्हणून आपल्या सर्वांना लसीकरण करून घ्यावं लागत आहे. अशातच आपल्या सर्वांना काळजीत टाकणारी बातमी समोर येत आहे. कोरोनापेक्षा भयंकर व्हायरसचं संकट सर्वांवर घोंगावत आहे.

कोंबड्यामुळे नवा व्हायरस पसरवण्याची भीती निर्माण झाली आहे. कोंबड्यांच्या पोल्ट्री फाॅर्ममधून विविध 8 प्रकारचे विषाणू बाहेर पडत आहेत. त्या विषाणूचा फैलाव झाला तर कोरोनापेक्षा भयंकर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी रशियामध्ये लाखो कोंबड्या अचानक मेल्या होत्या. त्या कोंबड्यांना एव्हियन फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. परिणामी त्या पोल्ट्री फाॅर्ममध्ये काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण झाली होती.

एव्हीयन फ्लूच्या या स्ट्रेनला एच5एन8 हे नाव देण्यात आलं आहे. या रोगाची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती. पण त्यावेळी जग कोरोनाशी लढण्यात व्यस्त होतं. आता कोरोना बराचसा आटोक्यात आल्यानंतर या रोगाची लस विकसित करण्यावर तज्ज्ञांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. रशियन फेडरेशनच्या चिफ अॅडवाझर अॅना पोपोव्हा यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेशी सल्लामसलत केली आहे.

दरम्यान, मागाील आठवड्यातच चीनमध्ये एच5एन8 या स्ट्रेनचे 48 रूग्ण आढळून आल्याचं वृत्त आहे. परिणामी वेळेतच या रोगावर लस विकसित करण्यात आली नाही तर जगाला आणखीन एका महाभयंकर महामारीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

आयपीएलमध्ये पुन्हा बाॅलिवूडची एन्ट्री! रणवीर-दीपिका घेणार नवीन संघ विकत

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More