बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृष्णप्रकाश यांच्या अडचणीत वाढ?; दुसऱ्या लेटरबॉम्बने पोलीस दलात खळबळ

पुणे | कृष्णप्रकाश यांच्यावर आज दुसरा लेटरबॉम्ब पडला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी कृष्णप्रकाशांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला. आहे.

कृष्णप्रकाश यांच्या काळातील अनेक अवैध उद्योग घडले असाही आरोप आमदार बनसोडे यांनी केला आहे. त्यांना यासंदर्भात वीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

झोपडपट्यांतील गरीब तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मागासवर्गीय अधिकाऱ्यांची गळचेपी करून त्यांच्यावर खोट्या कारवाया करणं असे गैरप्रकार कृष्णप्रकाश आयुक्त असताना शहरात झाल्याचं बनसोडेंनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, याआधीही पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) यांच्यासाठी जमीन व्यवहारातून तब्बल 200 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा या बनावट पत्रात करण्यात आला आहे. यामुळे खळबळ पोलीस दलात खळबळ उडालीये.

थोडक्यात बातम्या – 

IPL पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, एका खेळाडूमुळे ‘ही’ संपूर्ण टीमच आयसोलेशनमध्ये

राणा दांपत्याला दिलेल्या वागणुकीवरून फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची तोफ कडाडली, म्हणाल्या…

संजय राऊतांचा ‘चवन्नीछाप’ असा उल्लेख करत रवी राणांचा हल्लाबोल

Sanjay Raut| संजय राऊतांची मोठी घोषणा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More