महाराष्ट्र मुंबई

मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!

मुंबई | मुंबई विद्यापीठाने राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार नुकतेच शैक्षणिक कार्यक्रम जाहीर केलंय. त्यानुसार विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू हाेईल. दुसऱ्या सत्रातही वर्ग ऑनलाइनच भरतील. दुसरे सत्र 1 जानेवारी ते 31 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे.

आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. महाविद्यालयांबरोबरच विद्यापीठाने उपकेंद्रांसाठीही वेळापत्रक जाहीर केलं आहे.

ठाणे उपकेंद्रातील बीएमएस आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. मात्र, या वेळापत्रकाच्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार 90 दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होणार नसल्याची टीका शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

दरम्यान, वेळापत्रकानुसार उन्हाळी सुटी फक्त 13 दिवसांची असल्यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या-

…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”

वाढदिवसानिमित्त रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांकडून काव्यात्मक शुभेच्छा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या