बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

मुंबई | महाराष्ट्रासह संपुर्ण देशात कोरोनाची तिसरी लाट येणार, असं भाकीत तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मात्र,आता कोरोनाची तिसरी लाट अजुन संपलेली नाही, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यांनी तिसऱ्या लाटेसह अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना भारती पवार यांनी कोरोनाची दुसरी लाट अचानक आली, असं म्हटलं आहे. अजुनही महाराष्ट्र आणि  केरळ राज्यात रूग्ण वाढत आहेत. काही देशामध्ये तिसरी आणि चौथी लाट आल्याचं दिसतंय. त्यादृष्टीने महाराष्ट्रात तयारी सुरू आहे, असं भारती पवार यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी बुस्टर डोसबाबत सांगितलं आहे की, सध्यातरी दुसऱ्या आणि पहिल्या लसीच्या डोसबाबत गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत नाहीत, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.

कोरोना काळात अनेक हॉस्पिटल्सकडून जास्तीचं बिलं आकारण्यात आली होती. त्यावर बोलताना भारती पवार यांनी अतिरिक्त हॉस्पिटल बिल कमी करण्यात आलं आहे, असं म्हटलं आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणावर आवश्यक बाबी लवकरच पुर्ण केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भारती पवार यांनी पुणे महापालिकेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुणे महानगरपालिकेकडून चांगले काम झाले. पुण्यात ऑक्सिजन प्लांट उभारले गेले. तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीत 88 लाख लसीचे डोस देण्यात आले, असं भारती पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी केंद्राची भूमिका आहे, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या अन्…; शिवसेना आमदाराची कबुली

“फडणवीसांनी याचे पुरावे सादर करायला हवे”

प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट

आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More