बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐनवेळी आली ‘ती’ गुप्त खबर अन् पाकिस्तानात असलेल्या न्यूझीलंडने घेतला परतण्याचा निर्णय

नवी दिल्ली | तब्बल 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, दोन्ही संघात होणारा हा सामना न्यूझीलंडने रद्द केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय.

सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात आले नाहीत. टाॅसपुर्वी संघातील न्यूझीलंडचे तीन खेळाडू कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर पाकिस्तानचा देखील एक खेळाडू कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणेने न्यूझीलंड संघाबाबत सेक्युरी अलर्ट दिला आहे. न्यूझीलंड संघावर दहशदवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं अखेर सामना रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपुर्ण दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा मोठा धक्का आहे, याची आम्हाला जाण आहे. परंतु खेळाडूची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हीड व्हाईट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघासह एकदिवसीय मालिका खेळण्यास आलेल्या श्रीलंका संघावर 16 मार्च 2009 रोजी दहशदवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी’; शिवसेनेकडून स्पष्ट संकेत

‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे…’; उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवांराची प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More