Samsung Galaxy S23 ultra लाॅन्च, ‘हे’ जबरदस्त फिचर्स ऐकून वेडे व्हाल!

नवी दिल्ली| काहीदिवसांपूर्वीच सॅमसंग (Samsung) कंपनीच्या सिरीझमध्ये तीन नवीन फोन लाॅन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळेत फोनमध्ये असणाऱ्या फिचर्समुळं हे फोन लोकप्रिय बनत चालले आहेत. यांपैकी Samsung Galaxy S23 ultra हा फोन सगळ्यात पाॅवरफुल समजला जात आहे. प्रचंड अशा थक्क करणाऱ्या फिचर्समुळं हा फोन खरेदी केला जात आहे.

कॅमेरा हा फोनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यामुळे या Samsung Galaxy S23 ultra मध्ये 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अ‌ँगल लेन्ससह 200-मेगापिक्सलचा फ्रंट वाइड कॅमेरा आहे. 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर आहे. 10 ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर (sensor) आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ काॅलिंगसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. याफोनमध्ये येणारा डिस्प्ले हा एकदम जबरदस्त आहे. फोनमध्ये 1-120 च्या डायनॅमिक रीफ्रेश रेटसह एज क्वाडएचडी डायनॅमिक AMOLED 2X (Edge QuadHD Dynamic) डिस्प्ले आहे. हा फोन गेम मोडमध्ये 240 Hz चा टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो.

प्रोसेसरबद्दल सांगायचं झाल्यास या S23 ultra मध्ये क्वालकाॅम स्नैपड्रॅगन 8 जनरेशन 2 (Qualcomm Snapdragon 8 Generation 2) इतका प्रोसेसर आहे. 12 जीबी रॅम आणि 1 टीबी इतकं स्टोरेज आहे. S23 ultra मध्ये USB Type-C पोर्ट, 5F, Wi-Fi, 6E, 4G LTE आणि ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट करतो.

S23 ultra मध्ये 5000 MH बॅटरी 45 वॅट वायर्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 15 वॅट फास्ट वायरिंग (Fast wiring) 2.0 ला सपोर्ट करत. फास्ट चार्जिंगचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 20 मिनिटांत बॅटरी 65 टक्के चार्ज होईल असा दावा केला आहे. किमतीबद्दल सांगायचं झाल्यास या Samsung Galaxy S23 ultra ची किंमत 98 हजार 300 रुपये इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या