बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने जगभरात थैमान घातलं होतं. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारने या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरणावर भर दिलेला आहे.

21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्याअगोदर लहान मुलांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयारी दर्शवली असल्याची माहिती समजत आहे. भारतात या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने लहान मुलांना नोवोवॅक्स लस दिली जाणार आहे. नोवोवॅक्स लशीचं जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार असल्याचं समजत आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिली आहे. अमेरिकेच्या नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेली नोवोवॅक्स लस. दोन दिवसांंआधी लसीचे परिणामांबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, नोवोवॅक्स म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. लशीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असं नोवोवॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”

35 हजार लसी पडुन असल्याने ‘या’ महापालिकेचा लसीकरण सर्वांना सक्तीचं करण्याचा विचार

“काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू”

कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क – पुणे प्रशासन

‘या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे’; प्रदीप शर्मांना अटक झाल्यावर भाजपची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More