बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिलाची काळजी करू नका, बिंधास्त हॉटेलमध्ये जेवा; वाचा सविस्तर

मुंबई | हॉटेलमध्ये जेवण करणं म्हणजे खिशाला कात्री. खर्चात खर्च. खाद्यपदार्थांवर लागणारा सरकारचा कर आणि हॉटेल किंवा उपहारगृहाचा सेवा कर (सर्विस टॅक्स) यामुळे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला अशी परिस्थिती आजकाल पाहायला मिळत आहे. मात्र, हा सेवा कर आता लावला जाणार नाही. त्यामुळे हॉटेलच्या बिलांमध्ये मोठी घसरण होणार आहे.

हॉटेल्स आता ग्राहकांकडून सेवाशुल्क (Service Tax) घेण्यासाठी सक्ती करु शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या बिलात सेवाशुल्क असणार नाही. त्यामुळे हॉटेल्सची बिलं कमी होणार आहेत. हॉटेलने या नियमाचे पालन न केल्यास आणि सेवाशुल्क बिलात लावल्यास कारवाई होणार आहे.

सेवाशुल्क बिल दिले असेल किंवा दिलेल्या बिलावर वस्तू आणि सेवाकर लावण्यात आला असेल तर संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाला त्यातून सेवाशुल्क वगळण्यास तुम्ही विनंती करु शकता. तसेच व्यवस्थापकाने सक्ती केल्यास 1915 या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर तुम्ही तक्रार करु शकता, असे केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाने म्हटले आहे.

थोडक्यात बातम्या –

पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘मी कोणालाही घाबरत नाही…’, कालीच्या पोस्टर वादानंतर लिना मनिमेकलाईंचं स्पष्टीकरण

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

शिंदे गटाचा शिवसेना आमदारांना झटका, आदित्य ठाकरेंना मात्र मोठा दिलासा

पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More