बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील सात दिवस ‘या’ सेवा राहणार बंद

पुणे | पुण्यात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काही बंधने लागू करण्यात आली आहे. तसेच अनेक सेवा पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत नव्या निर्बधांसंदर्भात माहिती दिली.

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील, अशी माहिती सौरभ राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे. पुण्यातील PMPML बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे, असं सौरभ राव यांनी सांगितलं आहे.

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तसंच शहरातील शाळा महाविद्यालय 30 एप्रिल बंद राहणार आहेत, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार!

“येत्या 15 ते 20 दिवसात देशात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी पुण्यातील PMPML बससेवा राहणार बंद

पुण्यात आता लॉकडाऊनवजा निर्बंध; वाचा महत्त्वाची नियमावली

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More