बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठा निर्णय! अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई | सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित दिव्यांग शाळा-विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे येथील 4899 शिक्षक व 6159 अन्य कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. मागील मागील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती, सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात विविध त्रुटी दूर केल्या असून, या 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासूनचा सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील 11 हजार 58 शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याने, राज्यभरातील शिक्षक-कर्मचारी संघटनांनी धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आई आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू, बाप अत्यवस्थ; पत्नी आणि मुलगीही पॅाझिटिव्ह

लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवा अन्यथा 500 रूपये दंड भरा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात नवा नियम लागू

पुण्यातून राज्य चालवा नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या- चंद्रकांत पाटील

“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More