बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! सातवीतल्या मुलीने गळफास घेत संपवलं आपलं जीवन

औरंगाबाद | औरंगाबाद येथील इयत्ता सातवीत शिकत असणाऱ्या संजीवनी ऊर्फ दिपाली एकनाथ घेणेने गळफास लावून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री आनंदनगर गारखेडा परिसरात घराच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. सतत हसत खेळत असणाऱ्या संजीवनीने एवढ्या लहान वयात आत्महत्या का केली असावी?, अशा प्रश्नाने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

संजीवनीच्या आई वडिलांचा फुटाणे विक्रीचा व्यवसाय आहे. रोजप्रमाणे संजीवनीचे आई-वडील आणि तीचा लहान भाऊ आपल्या कामावर गेले होते. मात्र रात्री नऊच्या सुमाऱ्यास घरी परतल्यावर दरवाजा बंद असल्याकारण संजीवनी घरात नसल्याचा अंदाज त्यांनी लावला होता. दरवाजा उघडल्यानंतर संजीवनी घरात नसल्याचं पाहून ती शेजारच्या घरी गेल्याचा समज त्यांना झाला.

काही वेळा नंतर संजीवनीचा भाऊ काही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेला होता. तेव्हा त्याने संजीवनीला खोलीच्या लोखंडी अँगला गळफास घेतलेलं पाहिलं. तीला पाहून तो प्रचंड घाबरला. त्याच्या घाबरलेल्या अवस्थेत त्याने ही माहिती त्याच्या आई-वडिलांना सांगितली.

दरम्यान, पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी संजीवनीला फासावरुन खाली उतरवलं. त्यानंतर तीला दवखान्यात नेण्यात आलं मात्र डाॅक्टरांनी तीला मृत घोषित केलं. आत्महत्ये मागचं कारण अद्दाप समोर आलं नसून पुढील तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करणार असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ

बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या

“माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार”

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव…

13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने केलं ‘हे’ कौतुकास्पद काम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More