अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन ड्राईव्ह समोर, ‘हा’ बडा नेता अडचणीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बंगळुरू | कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा सरकारने केलीये. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत प्रज्वल रेवन्ना हे कर्नाटकातील हसन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या जागेवर 26 एप्रिल रोजी मतदान झालं आहे. एसआयटी त्यांचा शोध घेत असून ते जर्मनीला पळून गेल्याचं समोर आलं आहे.

माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ

प्रज्वल (Prajwal Revanna) यांचं प्रकरण एका सेक्स स्कँडलशी संबंधित आहे, ज्यामध्ये हजाराहून अधिक व्हिडीओ समोर आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये त्यांचे एक हजाराहून अधिक व्हिडीओ समोर आल्याचं कळतंय. दरम्यान, कर्नाटकात जेडीएससोबत आघाडी करून निवडणूक लढवत असलेल्या भाजपने या वादापासून मात्र स्वतःला दूर केलं आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने हसनचे विद्यमान खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) हे जेडीएस प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. रेवन्ना हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान JD(S) खासदार आहेत.

अश्लील व्हिडिओंनी भरलेला पेन ड्राईव्ह समोर

अश्लील व्हिडिओंनी भरलेल्या पेन ड्राईव्हमधून हा प्रकार समोर आला आहे. खासदार आणि एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच आरोप आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आलाय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी प्रज्वल (Prajwal Revanna) यांच्यावरील आरोपांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहिलं होतं. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटवर एका पोस्टमध्ये सांगितलं की, “सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडीओ क्लिप फिरत आहेत, जिथे महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं दिसून येतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”

तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!