बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांकडे प्रेयसीचं लग्न थांबवण्याची मागणी करणाऱ्या तरुणाची ‘ती’ प्रेयसी आली समोर म्हणाली…

पाटणा | कोरोना काळात लोकांच्या जीवाची काळजी घेऊन अनेक राज्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 13 मे ला बिहार मधील लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या ट्विटला एका तरुणाने रिप्लाय देत आपल्या प्रेयसीचं लग्न थांबवण्यासाठी मागणी केली होती. त्याच्या या मागणीची चर्चा देशभर झाली होती. मात्र आता या तरुणाचीच प्रेयसी समोर आली आहे. तसेच तिने आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नितीश कुमार यांच्या ट्विटला रिप्लाय देत तरुणाने प्रेयसीचं लग्न थांबवण्यासाठी लग्नावर बंदी आणण्याची मागणी केली होती. संबंधित तरुणाचे नाव पंकज कुमार गुप्ता असं आहे. यानंतर या ट्विटची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. संबंधित तरुणाच्या प्रेयसीचं उद्या लग्न असून तिने त्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित प्रेयसीचं ट्विटरवर ‘नव्या कुमारी’ नावाने अकाउंट आहे. तरुणाला उत्तर देताना, पंकज  पुजा नावाच्या मुलीशी बोलत असताना नव्याने अनेक दिवस रडून काढले असल्याचं तिने सांगितलं आहे. एवढच नाही तर ती हे लग्न आनंदाने करत असून पंकजने कोणात्याही प्रकारची बाधा यामध्ये आणू नये अशी विनंती केली आहे.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे नव्याने आपल्या उत्तरमध्ये लग्न कोणासोबत जरी झालं तरी तिचं प्रेम अर्थात तिचं ह्रदय कायम तरुणा जवळच असेल असं तिने यामध्ये म्हटलं आहे. तरुणाच्या ट्विटने तर या देशात चर्चा रंगलीच होती. मात्र आता त्याच्या प्रेयसीच्या उत्तराने या ट्विटने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

Picture Courtesy: Twitter/ Nitish Kumar

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या- शरद पवार

बाप लेकीच्या नात्याला काळीमा! लेकीनेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

‘त्या’ प्रकरणात कृष्ण प्रकाश यांच्यावर कुणाचा दबाव?, पिंपरीत जोरदार चर्चा

खंडणी प्रकरणामुळे राष्ट्रवादीने हाकललेल्या मंगलदास बांदलविरोधात नवा गुन्हा दाखल

कडक सॅल्युट! मुलगा कोरोनामुळे रूग्णालयात, वृद्ध आईचा मृत्यु डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More