‘या’ प्रसिद्ध मॉडेलची निघृण हत्या, मृतदेहासोबत केलं हे धक्कादायक कृत्य
नवी दिल्ली | माजी मॉडेल रेबेका लँड्रीथची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहासोबत घाणेरडं कृत्य करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.
रेबेका लँड्रीथचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मृतदेह सापडला, त्याच्या काही तास आधीच ही हत्या झाली आहे. तसंच शवविच्छेदनानंतर रेबेकाची तब्बल 18 गोळ्या मारुण हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी रेबेकाच्या हत्ये प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून त्या व्यक्तीची ओळख ट्रैसी रोलिंस नावानं झाली आहे. रेबेकाचा मृतदेह सापडला त्या ठिकाणापासून 250 मैल अंतरावरुन ट्रैसीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्यावर हत्या आणि मृतदेहासोबत घाणेरडं कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर दाखल केला आहे.
दरम्यान, रेबेकाच्या हत्येनंतर तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. रेबेका तिच्या पाच भावंडामध्ये सर्वात लहान होती. 2014 मध्ये प्रोफेशनल करिअरची सुरुवात केली होती. 2014 झालेल्या स्पर्धेत ती मिस मैनहेटनची फाइनलिस्ट ठरली होती. मॉडेल इंडस्ट्रीसोबत रेबेनाचं नाव फॅशन इंडस्ट्रीतही प्रसिद्ध होतं.
थोडक्यात बातम्या-
‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला
पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश
IPS कृष्णप्रकाश अॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!
आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!
कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???
Comments are closed.