‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा
बीजिंग | कोरोना जगभर पसरवल्याच्या आरोपातून चीनला जवळपास क्लीन चिट मिळाल्याचं दिसत आहे. कारण कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर प्राण्यांमधून झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून नव्हे, तर वटवाघळे किंवा प्राण्यांच्या गोठवलेल्या मांसातून कोरोना पसरल्याच्या शक्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनसोबत संयुक्त अभ्यास करून हे संशोधन केलं आहे. मात्र हा प्रसार चीनमध्येच का झाला, अन्य देशांतील वटवाघळे किंवा प्राण्यांतून का नाही, याचं उत्तर या अहवालात नसल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी या विषाणूचा संसर्ग झाला. मात्र तो वुहानमधील चीनच्या प्रयोगशाळेतून किंवा तेथील गळतीतून झालेला नाही, असा निर्वाळा आरोग्य संघटनेनं दिला आहे.
या अहवालाला अंतिम स्वरूप आलं असून त्याची सत्यता पडताळणी आणि भाषांतर केलं जात आहे. येत्या काही दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्ही हा अहवाल जाहीर करू, असं जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम
संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत त्यांचं योगदान आहे पण…- बाळासाहेब थोरात
धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!
“पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, वेळ मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या”
वडिलांनी घर विकून शिकवलं; पोरानं पहिल्या प्रयत्नातच केली UPSC ची परीक्षा क्रॅक
Comments are closed.