बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ अन्…

पुणे | कोरोना काळात मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्वांचे ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. यादरम्यान अनेक वेगवेगळ्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. अशातच पुण्यातील एका शाळेचं ऑनलाईन क्लास सुरु आसताना अचानाक पाॅर्न व्हिडीओ सुरु झाला. यानंतर पुर्ण क्लासमध्ये एकच खळबळ उडाली.

पुण्यातील एका इंग्लिश मीडियम शाळेतील ही घटना आहे. शिक्षिका ऑनलाईन लेक्चर घेत असताना अश्लील व्हिडीओ सुरु झाला. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट चॅटमध्ये याबाबतची माहिती दिली तरी शिक्षिकेला याबाबत काहीच कल्पना लागली नाही. यानंतर काही विद्यार्थांनी लेक्चर लेफ्ट केलं तर काहींनी याबाबतची तक्रार आपल्या पालकांकडे केली.

पालकांनी शाळेत जाऊन मुख्यध्यापकांकडे तक्रार केली. यावेळी हे सायबर गुन्हेगाराने केलं असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला असून याबाबतची कारवाई करण्यात येईल, असं देखील त्या म्हणाल्या. संबंधित घटनेची संपुर्ण माहिती घेऊन आता या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली जाईल.

दरम्यान, ऑनलाईन शिक्षणामुळे असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक घटनांचे तर व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. अशातच आता या प्रकारानंतर शिक्षिका आणि संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More