नवी दिल्ली | गाडी चालवताना ड्रायव्हरला कसरती करत गाडी चालवावी लागते. दरी किंवा छोटा रस्ता असेल ड्राव्हरला तारेवरची कसरत करावी लागते. चार चाकी गाड्या चालवतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यातच आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ट्रक दरीत कोसळसेल अशा अवस्थेमध्ये दिसत आहे.
ट्रकचालक दुर्गम आणि दरी असलेल्या भागामध्ये ट्रक चालवत आहे. ट्रकचा काही भाग पाठीमागील रस्त्यावर आहे तर ट्रकचं तोंड दरीमध्ये आहे. ही ट्रक चालकासमोर दरीतून काढण्याचे आव्हान आहे. हा व्हिडीओ पाहत असताना पुढे काय होईल हेदेखील सांगणे कठीण आहे. हा ट्रक चालकाने रस्त्याची कोणतीही माहिती घेतल्याशिवाय ट्रक चालवल्यानं असा प्रकार घडल्याचं दिसतंय.
डोंगराळ भागातील असणारा हा रस्ता अरूंद आणि एकाच वेळी एक वाहन जाईल असा आहे. पुढे काही बांधकाम सुरू असल्याने ट्रक चालकाला तिथंच थांबावे लागले. त्यामुळे ट्रक अशा स्थितीमध्ये आहे की, पुढेही जाऊ शकणार नाही आणि सहज मागेही घेता येत नाही. ट्रकचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, डोंगराळ रस्ता आणि खोल अरूंद दरी यांच्यामध्ये हा ट्रक अडकला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ट्रकचालकाच्या जीवावरही बेतू शकते. हा व्हिडीओ memewalanews या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
शाळा बंद पण शिक्षण चालू! स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय अनोखा उपक्रम
कोरोनातून लवकर बरं व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी खाण्याच्या टाळा
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुंबईत प्रथमच धावणार…
“मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका केली”; संजय राऊत भडकले
Comments are closed.