बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्तेतल्या दुर्योधनांना वाचवण्याचं पाप सुरु आहे’; चित्रा वाघ यांचा घणाघात

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास (Winter Session) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुपंलेली पहायला मिळाली. आमदार भास्कर जाधव (Mla Bhaskar Jadhav) यांनी मोदींची नक्कल केल्याने काल अधिवेशनात भाजप नेत्यांनी एकच गोंधळ घातला होता. यावरुनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी भास्कर जाधवांचा ट्विटवरून चांगलाच समाचार घेतला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट मध्ये महाविकास आघाडीचा उल्लेख कौरव म्हणून केला आहे. तर भास्कर जाधव यांना शकुनी असं संबोधलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व महाविकास आघाडीतील कौरव एकत्र आले आहेत. त्यात भास्कर जाधव शकुनीची भुमिका पार पाडत आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं  आहे.

पुढे त्यांनी “सत्तेतल्या दुर्योधनांना वाचवण्याचं पाप सुरु आहे. अशा कृत्याने विधानसभेचं अवमूल्यन होतं आहे,” असं म्हणत भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली आहे. “अंगविक्षेप करून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या भास्कर जाधव यांच तातडीने निलंबन करा,” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काल अधिवेशनात भास्कर जाधव आणि विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्यात तुफान राडा झाला. जाधव यांनी मोदींची नक्कल केल्याने सभागृहातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर फडणीवासांनी जाधव यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी लावून धरली होती. अखेर जाधव यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटलं.

 

थोडक्यात बातम्या-

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More