बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला टाॅम अँड जेरी आवडतं, पण सध्या माकड उड्या बघतोय”

सातारा | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलेलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या परिस्थितीवरून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राजकीय वातावरण कोणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

माझं आवडतं चॅनेल टॉम अँड जेरी आहे. मात्र, सध्या मी ते बघायचे बंद केले आहे आणि सध्या ज्या माकड उड्या सुरू आहेत त्या बघत बसतो, असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे. कोण कोणाला मारतयं, कोण कोणाला आत टाकतयं हे बघतोय, मजा येते, अशी बोचरी टीका उदयनराजेंनी केली आहे.

कोण म्हणतयं तो मुख्यमंत्री आहे का? तो आहे का तो आहे का, अशी चर्चा सुरू आहे. कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली. लोक भरपूर आले होते. पण तुमची डिलीवरी काय होती?,असा सवाल त्यांनी केला आहे. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मग यांना दाखवतो, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही ईडीची चेष्टा लावलेली आहे. पानपट्टीवर बीडी मिळते तशी ईडीची अवस्था झाली आहे. लावा ना ईडी, चाप लावा. घ्या सगळे ताब्यात. यांना दांडक्याने सडकूून काढले पाहिजे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

इंधन दरवाढीवरून PM मोदींनी महाराष्ट्राला सुनावलं, म्हणाले…

“…नाहीतर त्याच ठिकाणी किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”

“सोंगाड्या चित्रपट निघाला असता तर राऊतांनाच भूमिका मिळाली असती”

…तर 123 कोटी लोकांचा रक्तगट बदला -संभाजी भिडे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More